यशोगाथा श्री नागरी सहकारी पतसंस्थेची

सहकारी संस्था मुळातच चालतात त्या संचालक मंडळाच्या त्यागावर, सभासदांच्या विश्वासावर, कर्जदारांच्या नैतिकतेवर आणि कर्मचा-यांच्या मेहनतीवर ! असे हे सहकारात सहकार्य करणारे सहकारी एकत्र आले आणि श्री नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मीती झाली. “सहकार्यातून समृदधी ” हे ब्रीद वाक्य सर्वांनी मनात पक्के बिंबविले आणि आज आपली पतसंस्था जनमानसात रूजली, वाढली आणि विविध शाखांच्या द्वारे विस्तारत आहे. "विना सहकार नाही उदधार !” “एकमेका सहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ||” आणि सहकारातही प्रजातंत्र की शक्ती है । या सहकारी चळवळीमधील मुळमंत्राचा अर्थ समजुन घेत संस्थेची आज २3 व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.

सन २००१ साली पतसंस्थेची स्थापना दापोडी येथे झाली. आणि आमची श्री नागरी पतसंस्था सहकारी चळवळीचा एक अविभाज्य घटक बनली. मी या संस्थेचा मालक नसुन एक विश्वस्त आहे. ही भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. एस. बी. पाटील यांनी जपली. त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळाने त्यांचे अनुकरण केले. पतसंस्थेचे पावित्र्य जपले. तिच परीस्थिती कर्मचारी वर्गाची! मी कुणा संचालकासाठी काम करत नसुन संस्थेसाठी माझ्या सभासदांच्या हितासाठी काम करत आहे. अशा श्रदधेने निष्ठेने कामात स्वतःला झोकुन दिले. संस्थेचे जनरल मनेजर श्री. अशोक भोकसे यांनी नेहमीच 'समता, बंधुता, न्याय' ही त्रीसुत्री अंगीकारली. सेवा त्याग समर्पण ही भावना कर्मचा-यांच्या मनात सतत तेवत ठेवली. म्हणुनच आज ही वटवृक्षरूपी पतसंस्था बहरत आहे.

तसे पाहीले तर संचालक आणि कर्मचारी ही या श्री नागरी पतसंस्थेच्या रथाची दोन चाके आहेत. संचालक मंडळाच्या मिटींग मध्ये संस्थेच्या हिताचे काही धोरणात्मक निर्णय होतात. त्याची अंमलबजावणी कर्मचारी वर्गाकडुन योग्य वेळेत व योग्य प्रकारे केली जाते. त्याचे फलीत म्हणजे संस्थेला मिळणारे यश होय. अगदी चेअरमन साहेबांपासुन ते शिपायापर्यंत सर्वांचे योगदान या यशामध्ये आहे. संचालक मंडळावरील सभासद कर्मचा-यांची श्रदधा कर्मचा-यांमध्ये असणारी कामाप्रती निष्ठा तसेच सर्वांचे जबाबदारीने काम करणे यामुळेच प्रगती प्राविण्य व नविन व्यावसायीकतेची स्वप्ने या गोष्टी घडत आहेत . अब्दुल कलाम साहेबांच्या नजरेतुन स्वप्न हे जागेपणी पडले पाहीजे झोपेत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.

या काळात मा. संचालक मंडळाने आपल्या कामकाजात गतीमानता ठेवत जगाच्या प्रवाहासोबत धावण्याच धाडस निर्माण केल . पतसंस्थेच्या कामकाजात व्यावसायीकता आणली. व आपली पतसंस्था ही बँकेपेक्षा कमी नाही ही जाणिव सभासदांमध्ये निर्माण केली. पतसंस्था कालमानाच्या गतीशी समतोल चालली पाहीजे. बदलते स्पर्धात्मक अर्थ कारण त्यात तांत्रिक साधनांची जोड यामुळे अर्थकारणाचा बदललेला बाज या बरोबर ताळमेळ राखत केवळ ठेवी व कर्ज यासाठी सभासद ग्राहकांना सेवा न देता NEFT/RTGS या सारख्या अद्ययावत डिजीटल सेवा अन्य बॅंकांच्या सहकार्याने पतसंस्था ग्राहकांना देत आहे. पतसंस्थेचे सर्व व्यवहार संगणकीकृत आहेत. ठेव पावत्या शेअर्स सर्टीफीकेट हे कंप्युटराईज प्रिंटद्वारे दिल्या जातात. त्याचप्रमाणे कोअर बँकींग प्रणाली संस्थेने सन २०१५ पासुन अंगीकारली आहे . पिग्मी कलेक्शन साठी अद्ययावत यंत्रणा संस्था वापरत असल्याने पतसंस्था सर्व ग्राहकांसाठी उपयुक्त अर्थकेंद्र बनली आहे.

पतसंस्था म्हणुन कामकाज करताना अनेक मर्यादा आहेत परंतु तरीही संधीही अमर्याद आहेत सभासदांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम संस्था करत आहे. केवळ नफा कमावणे हा संस्थेचा उददेश नसल्यानेच आज संस्थेच्या माध्यमातुन कितीतरी उच्चशिक्षीत अधिकारी झाले, उद्योगपती झाले, डॉक्टर्स, इंजीनिअर्स, चार्टर्ड अकौंटंट झाले. सभासदांची सामाजीक आर्थिक पत प्रतिष्ठा वाढली. आजही अगदी छोटा व्यावसायीक भाजी विक्रेता नोकरदार ते मोठ मोठे उद्योजक यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी संस्था नेहमीच तयार आहे. नफा केवळ पैशात न मोजता सभासदांचा त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास झाला यावर नफा मोजला जातो. आणि हाच काय तो संस्थेचा नफा होय!

सामाजिक उत्तरदायीत्व म्हणुनही संस्थेचे योगदान मोलाचे आहे. वृक्षारोपण कार्यक्रम सामाजीक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींचा गुणगौरव कोवीड १९ या साथरोगात आर्थिक दृष्या दुर्व- ल व्यक्तींना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येही संस्थेने रू. १,५१,०००/- चे योगदान पतसंस्थेने दिले आहे. संस्था ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहेच त्याप्रमाणे विविध प्रकारच्या कर्जावरचेही व्याजदर कमीत कमी आहेत. संस्था ज्येष्ठ नागरीकांना ज्याप्रमाणे अर्धा टक्का जास्त व्याजदर देते त्याप्रमाणे सामाजीक बांधीलकी म्हणुन दिव्यांग व माजी सैनिक यांनाही अर्धा टक्का जास्त व्याजदर देत आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने नेतृत्वाचा उपयोग समाजकारणासाठी व्हावा हे तत्व अंगिकारले आहे.

पतसंस्थेची सुरूवात सन २००१ मध्ये म्हणजे २२ वर्षांपूर्वी झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असे आहे. सध्या संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहर परीसरात दापोडी, संभाजीनगर चिंचवड, पिंपळे सौदागर चिंचवड स्टेशन,भांबोली,महाळुंगे-इंगळे,निघोजे,मोशी या ठिकाणी आठ शाखा आहेत. त्याच प्रमाणे स्वतंत्र मुख्य कार्यालय चिंचवड स्टेशन येथे आहे. सुरूवातीस ३२० सभासद असलेली संस्था दि. ३१/०३/२०२३अखेर ४३९८ सभासदांसह कार्यरत आहे. सुरूवातीस १ लाख ६५ हजार असलेले भागभांडवल आज ४ कोटी ८८ लाख इतके आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या दोन शाखा इमारती या स्वमालकीच्या आहेत. केवळ ३ कर्मचा-यांसह सुरू झालेली संस्था आज ७० कर्मचारी व ११ पिग्मी एजंट असे ८१ कुटूंबांचे उपजीविकेचे साधन आहे. संस्थेचे हे कार्य प्रत्येक सभासदास आनंद देणारे आणि अभिमान वाटाव असेच आहे. पिंपरी चिंचवड शहारामध्ये विश्वसार्ह संस्था म्हणुन आपली प्रतिमा ठळकपणे उभी करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. शिस्त व वक्तशिरपणा याच बरोबर व्यावसायीक दृष्टीकोनाची जोड देत सहकाराचा मुलमंत्र जपत श्री नागरी सहकारी पतसंस्थेचे आर्थिक विश्व चोहोबाजुंनी विस्तारत आहे. आर्थिक व्यवहारांना संयत गतीने अग्रेसर करत २२ वर्षे कार्यप्रवण राहीलेली संस्था महाराष्ट्रातल्या पतसंस्था जगतात अनुकरणीय संस्था म्हणुन गणली जाते. यातच संस्थेचे उत्तम कामकाज अधोरेखीत होते.

ठेवीदारांचा पतसंस्थेवरील असलेल्या विश्वासामुळे संस्थेकडे ठेवीदारांचा ओघ सातत्यपुर्ण आहे. तसेच संस्थेच्या भाग भांडवलातही गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार पिग्मी एजंट यांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. 0% एनपीए आणि सर्व शाखांची ९९% कर्जवसुली हा मानदंड संस्थेने आबादित राखला आहे. प्रारंभी खुप कठीण परीस्थीतीला सामोरी जात अनुभवाची शिदोरी संपन्न करत पावलागणिक विश्वासर्हता दृढ करत संस्थेने कोणालाही अभिमान वाटावा अशी सातत्यपुर्ण आर्थिक मजल मारली. ४३९८ सभासद रू. १६०.१७ कोटी ठेवी रू.९९.७० कोटींचे कर्ज वाटप मार्च अखेर १ कोटी ८३ लाख नफा, सातत्याने दरवर्षी ११% प्रोरेटा पदधतीने लाभांश वाटप तसेच स्थापनेपासुन ऑडीट वर्ग 'अ' मिळवीणारी त्याचप्रमाणे रू. २५० कोटींचा व्यवसाय पुर्ण करणारी कृतार्थ वाटचाल करत संस्था गेली २२ वर्षे अग्रेसर होत आहे.

संस्थेने सेवक वर्गासाठी स्टाफ मेडीक्लेम पॉलीसी, अॅक्सीडेंट पॉलीसी, बोनस, ग्रॅच्युईटी प्रॉव्हीडंड फंड इ. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेने विशेष ठेव योजने अंर्तगत ठेवीदारांना शेअर्स भेट म्हणुन दिले आहेत. आज पावेतो संस्थेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

सांख्यीकीय आकडेवारी महत्वाची असतेच परंतु ही सांखिकीय गणिते ज्या सभासदांनी खातेदारांनी दृढ केली ते सभासद आकडेवारी पेक्षा अधिक महत्वाचे कारण सहकारात माणसांना महत्व आहे. सहकार्याच्या भावनेला महत्व आहे. सहकार्याच्या भावनेला महत्व आहे. एका उददेशाने प्रेरीत होऊन एकत्र आलेल्या सभासदांचा एकजिनसी समुह आणि या समुहाच्या सहयोगाने उभे राहीलेले भांडवल त्यातुन होणारे व्यवहार हे चक्र सातत्याने सुरू राहण्यात संस्थेशी संलग्न असलेल्या प्रत्येकाच्या योगदानाची ताकद म्हणजे श्री नागरी सहकारी पतसंस्था .गेली २२ वर्षे या संस्थेच्या शिर्षस्थानी राहुन मा. एस. बी. पाटील साहेब यांनी सहकार मंत्र जपला. अनेक धोरणात्मक निर्णय घेत अनेक उपक्रम राबवत विश्वास, शिस्त, जपत अविरत मेहनत करत कौटुंबीक व व्यावसायीक गोष्टींना वेळ प्रसंगी बाजुला ठेऊन संस्थेसाठी घेतलेल्या जबाबदारीचे निर्वहन करण्यास प्राधान्य दिले. अनेक माणसे जोडली. या सर्वातुन हे यश प्राप्त झाले. हा प्रशस्त यश विस्तार खुप समाधान देणारा आहे . प्रामाणिक व पारदर्शी पदधती शिस्त निःस्वार्थ सेवा आणि श्री गणेशाचे कृपाशिर्वाद या सर्वावर उत्तुंग शिखराकडे मार्गस्थ असणारी आपली सर्वाची जिव्हाळयाची श्री नागरी सहकारी पतसंस्था !